आज जर मी म्हणालो कि मी हिंदुत्त्ववादी आहे तर १०० जणांपैकी ९९ जण तरी मला कट्टर हिन्दु धर्माचे समर्थक समजतील ,काही म्हणतील मला दुसरा धर्म आवडत नसणार तर काहींना वाटेल मी अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता दिसतोय .यात त्यांचा दोष नाहीये ,कारण हिंदुत्व म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न फार कमी जणांनी केलाय .त्यामुळे मला एक गोष्ट इथे ठासून सांगावीशी वाटते कि हिंदुत्व म्हणजे धर्माने हिंदू असणे नव्हे .हिंदुत्त्व चा संबंध फक्त हिंदू धर्माशी नाहीये ,कारण जीवन सर्वच धर्माचे लोक जगतात आणि हिंदुत्त्व नावाची जगण्याची पद्धत स्विकारायचा सर्वांनाच समान हक्क आहे .
श्रीरामांनी असो व श्रीकृष्णांनी ,तसेच आधुनिक काळात शिवाजी महाराज असो वा स्वामी विवेकानंद ,या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हिंदुत्त्व जागून दाखवले ,आणि आज काळाच्या ओघात आपण तेच विसरत आहोत .वडिलांच्या एका शब्दाखातर १-२ नव्हे तर १४ वर्षांसाठी रामान वनवास हसत-हसत स्विकारण वा जिजाऊनी घालून दिलेल्या संस्कारांच्या वाटेवर आयुष्यभर शिवाजी महाराजांनी चालण ,हे आहे हिंदुत्त्व ,पण आज किती मुल आई-वडिलांचं ऐकतात ,त्यांना आयुष्यभर जीवापाड संभाळण तर सोडा हो ,त्या दोन जीवांना म्हातारपणी साध घरातही ठेवावं वाटत नाही मुलांना ,हेच का याचं हिंदुत्त्व .
द्रौपदी च्या वस्त्रहरणाच्या वेळी तिच्या मदतीला धावून जाणारा कृष्ण वा ताब्यात सापडलेली शत्रूची सुंदर अशी स्त्री सन्मानाने परत पाठवणारे शिवाजी महाराज ,हे खरे हिंदुत्त्वाचे वाटेकरी ,आजचे मुलगी दिसली नाही कि तिच्याविषयी असभ्य भाषेत बोलणार आणि स्त्री ला फक्त खेळण्याचे वस्तू समजणारे कसे असू शकतात हिंदुत्त्ववादी .श्रीकृष्णाच्या ८ पत्नींपैकी एक चक्क आदिवासी कन्या होती ,जाम्बवती तीच नाव .म्हणजे हिंदुत्वाचा संस्थापक म्हणावा तो कृष्ण स्वतः जाती-धर्म न पाहता या नात्याला आपलस करतो ,हे नाही का खर हिंदुत्त्व .आज मी या धर्माचा तो या जातीचा ,असल्या वायफळ कारणांनी भांडणार्या तरुणांमध्ये कसलं आलय हिंदुत्त्व .
आपल अख्ख आयुष्य समाजसेवेसाठी आणि तरुणांमध्ये हिंदू धर्माविषयी आदर आणि प्रेरणा उत्पन्न व्हावी म्हणून जन्मभर भटकंती करणारे ते विवेकानंद ,त्यांच हे समाजासाठीच त्याग हेच तर आहे हिंदुत्त्व ,आपल्या समाजासाठी आपल्या लोकांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणे म्हणजे हिंदुत्त्व .काळ्या पाण्याची शिक्षेला पण न भीता सामोरे जाणारे सावरकर ,त्यांच्या या धैर्यात आहे खर हिंदुत्त्व ,"ने मजसी परत मातृभूमीला ,सागरा प्राण तळमळला " अशी आर्त हाक देणाऱ्या सावरकरांच्या मातृभूमीच्या ओढीत आहे खर हिंदुत्त्व .पण आज पाहायला मिळत ते भारत सोडून पैशांसाठी विदेशात जाणार्या तरूणांच हिंदुत्त्व ,पैशासाठी प्रसंगी देशालाही विकायला काढनाऱ्या तरूणांच हिंदुत्त्व ,देशात काय चालली याकडे लक्ष न देता स्वतःमध्येच हरवलेल्या तरूणांच हिंदुत्त्व ..
आज हिंदुत्त्वाचा झेंडा गेऊन फिरणारे अनेक दिसतात पण हे हिंदुत्त्व जागून दाखवणारे फार कमी .हिंदुत्त्व जगण्यासाठी गरज आहे ती आपली संस्कृती आपले संस्कार व आपला इतिहास समजून घ्यायची .गरज आहे कि पूर्ण जगाला दाखवून द्यायची कि पुरातन काळापासून हा भारत देश ज्या संस्कृतीच्या जोरावर सर्वात श्रेष्ठ म्हणून जगला तीच संस्कृती आजपण आपल्या रक्तामध्ये अस्तित्वात आहे ,आणि त्यालाच हिंदुत्त्व म्हणतात ….
- सुधीर
No comments:
Post a Comment