गच्चीवर कठड्याला हात टेकवून दोघे निवांत उभे होते ..
पण ती आज कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती ..
हे जाणवताच त्याने विचारलं "काय झालं ? कसला विचार करत आहेस ?" ..
ती "मला ना आज खूप एकटं-एकटं वाटत आहे ,का कुणास ठाऊक पण सर्व आपली अशी माणसं जवळ असून सुद्धा मला त्यांच्यात असल्यासारखं वाटत नाहीये .. एक वेगळाच एकांतपणा जाणवतोय मनात ,असं वाटत कि कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन नुसतं बसावं ,तासनतास फक्त बसून राहावं " ..
तो "मला सुद्धा कधी कधी असंच वाटत .. किंबहुना मला तर वाटत की आपल्यालाच नाही तर सर्वांनाच कधी ना कधी हे असं नक्कीच वाटत असणार ,गर्दीमध्ये असूनसुद्धा हा एकटेपणा नक्कीच जाणवत असणार " ..
ती "बाकीच्यांचं नाही माहित पण मला नाही आवडत रे हा नसलेला पण तरीही जाणवणारा एकटेपणा .. कधी भविष्यात मी खरंच एकटी पडली तर मग काय करू .. आत्ता फक्त जाणवणारा हा एकटेपणा एक दिवस खरंच माझ्या वाट्याला आला तर कस करू ?मला तर काळजीच वाटते " ..
तिचं हे बोलणं ऐकताना तो काहीच नाही बोलता फक्त समोर दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे पाहत होता ..
शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं "तू काय करतोस रे असं एकटं एकटं वाटायला लागल्यावर ?? "
त्याने तिच्याकडं पाहिलं तर तिचा चेहरा एकदम चिंतातुर झाला होता ..
तेव्हा तो गालातल्या गालात थोडंसं हसला आणि म्हणाला
"एक काम कर .. ते समोर पसरलेलं क्षितिज पहा ,अगदी जिथपर्यंत तुझी आणि माझी नजर पोहोचते तिथपर्यंत पसरलेल ते क्षितिज .. एकाच वेळेला आभासी पण तरीही तितकच खरं आणि शाश्वत .. आणि असं उदाहरण दुसरं नाही सापडणार ,जे एकाच वेळी आभासी पण आहे आणि तितकंच खरं सुद्धा .. आभासी ,कधीही हाताला न येणारं .. जेवढं त्याच्या मागे जाशील तेवढं ते आणखीन पुढे पुढे सरकत जाणारं " ..
"पण असं आभासी असूनसुद्धा ते शाश्वत असत आपल्या आयुष्यात .. तुझ्या-माझ्या आधीसुद्धा त्याच अस्तित्व होत ,आज आपण आहोत आणि तोसुद्धा आहेच आपल्यासोबत ,आणि आपल्यानंतरही त्याच अस्तित्व असेलच .. म्हणून कधीही एकटं-एकटं वाटलं ना कि मी या क्षितिजाकडे पाहतो .. तो असतो कायम इथे ,नेहमी माझ्या सोबत .. मी कुठेही गेलो तरी हा तिथे असतोच , मला कधीही एकटा पडू देत नाही हा .. आता इथे गच्चीवर सुद्धा आहे तो ,कधी एकट्याने प्रवास करताना खिडकीतून बाहेर पहिलं की हमखास दिसतोच तो ,कधी कधी निराशेने भरलेल्या एकट्या अशा काळोखाच्या रात्री खिडकीमध्ये येऊन पहिलं तरीसुद्धा तो असतोच तिथे ,जेव्हा जेव्हा एकटं-एकटं वाटलं तेव्हा तेव्हा तो सोबत होता आणि यापुढे सुद्धा असेलच " ..
त्याच बोलणं ऐकण्यात हरवलेली ती नकळत त्या समोर दिसणाऱ्या क्षितिजाकडे पाहण्यात कधी गुंग झाली तिलासुद्धा नाही कळालं ..
- सुधीर
good one
ReplyDeleteThanks rupali ..
DeleteYour blogs always acts as answers to so many questions...writer ...you just write so perfect...nice one����
ReplyDeleteGlad to hear that Pratiksha .. Keep visiting .. And Thanks for appreciation
DeleteMla pn ans milale. Thanks
ReplyDeleteIts my My pleasure Shraddha that u find ur answers .. Keep visiting and Thanks ...
Delete