तळहात तुझा टेकव
माझ्या या हातांवर
पाऊससुद्धा पडेल मग
त्या तहानलेल्या फुलांवर ..
ओल्या स्पर्शाने तुझ्या
उजळेल अशी ती रात्र
आपल्या प्रेमाच्या वर्षावात
न्हाऊन निघेल ती रात्र ..
हे आभाळ फाडून चंद्र
सुद्धा येईल साक्षीला
अन स्पर्श तुझा नि माझा
लाजवेल त्या रात्रीला ..
- सुधीर