Thursday 23 January 2014

आता तरी सोडा

       
         
              आज हा लेख लिहावासा वाटला कारण मन खूप अस्वस्थ आहे .. नुकतच "मुक्तांगण" या संस्थेचा नुकताच केलेल्या सार्वेक्षणाचा रेपोर्ट आला आणि मन हादरून गेले ,त्या रेपोर्ट नुसार सध्या १६ ते २६ या वयोगटातल्या मुला-मुलींचं दारू ,सिगारेट आणि तंबाखू याचं सेवन करायचं प्रमाण इतक वाढल आहे कि चिंताजनक परिस्थिती आहे .. खरच काय मिळत या मुलांना हे जीवघेणे प्रकार करून ???
           माझ्या मनात राहून राहून हाच विचार येतोय कि आपल्या भारतात ,आपला देश संस्काराचा ,पवित्र परंपरांचा ,तरीपण हि मुल या विषाच्या आहारी का जातायेत ,स्वतःचा जीव एवढा का स्वस्त वाटतो यांना ,का हे जगण खेळ वाटायला लागल आहे या मुलांना .. यांना हे काळत कस नाही कि जी दारू ते आज मजेत पीत आहेत तीच दरू एक दिवस याचं आयुष्य पिउन टाकणार आहे .. जी तंबाखू आज हे आवडीने चघळत आहेत तीच तंबाखू एक ना एक दिवस याचं आरोग्य चघळून टाकणार आहे .. ज्या सिगारेट च्या धुरात आज या मुलांना अभिमानाने उभ रहावस वाटत तोच धूर यांच्या भविष्याला असाच धूर-धूर करून टाकेल ..
         आपण आपल्या घरातल्या माणसांसोबत जे सण साजरे जे क्षण एकत्र घालवतो ,तेव्हा आपल्याला मिळणारा आनंद खरा ,सुख-दुखाच्या वेळेला आपल्या माणसांचा जो साथ मिळतो ती साथ खरी ,जगण्याची खरी मजा खरा आनंद हा प्रत्येक क्षण जगण्यात ,आपल्या आप्त लोकांच्या सानिध्यात सुख-दुखात राहण्यात आहे ,पण या व्यसनापायी या मुलांची आनंदाची व्याख्याच बदलली आहे ,जगण्याची खरी मजा ऐश करण्यात ,दारू ढोसंण्यात ,सिगारेट फुंकत बसण्यातच आणि जो मित्र असल्या बाबतीत आपल्याला साथ देतो तोच आपला खरा साथ देणारा ,असले नको ते गैरसमज वाढतोय या मुलांत ..
          स्वतःच आयुष्य हे फक्त स्वतःच नसत ,आपल्या आयुष्याशी कित्येक आयुष्ये जोडलेली असतात ,तेव्हा स्वतःच्या आयुष्यासोबत असे खेळताना एकदा आईवडील किंवा आणखी कोणी असतील त्यांचा विचार करा ...  अरे तुमच्या पोटात अन्न जाव म्हणून कित्येक वेळा त्या आईवडीलानी स्वतःच्या पोटाला चिमटा काढलेले असतो आणि आज थोडी अक्कल आली तर तुम्ही त्याच पोटात दारूचे प्याले आणि सिगारेटचा धूर सोडताय ,कसली आहे हि विचारसरणी या तरुणांची .... रस्त्यावरच डुकर सुद्धा चिखलात लोळत ते त्याच्या शरीराला थंडावा मिळावा म्हणून ,म्हणजेच ते डुक्कर सुद्धा स्वतःच्या चांगल्यासाठीच चिखलात लोळते पण हे तरुण कुठल्या असुरी खोट्या आनंदापायी या व्यसनाच्या चिखलात रुतत चालले आहेत याचा विचार व्हायला हवा ..
         व्यसन हे सुटायला अवघड असत अस म्हणतात ,पण मनात खरी इच्चा असेल आणि आईवडीलांचा आशीर्वाद असेल तर काहीही अशक्य नाहीये ... अरे आपण विवेकानंद ,रामदास यांच्यासारख्या त्यागमूर्तींचे वंशज .. शिवाजी महाराज ,भगत सिंग यांच्यासारख्या देशासाठी लढणाऱ्याचे वंशज ,म्हणून या व्यसनाशी लढण आपल्याला अवघड नाहीच आहे .. गरज आहे ती फक्त आपण कोण आहोत ,का आहोत आणि काय करत आहोत ते ओळखून जाग होण्याची ...... शेवटी मी कुठतरी वचलेलं एक वाक्य आठवत ,
                                "Your life does not get better by Chance ,It gets better by Change"

                                                                                                       - सुधीर 

No comments:

Post a Comment