Sunday 19 January 2014

मुक्ती विठ्ठलाची

                             
                             सुप्रीम कोर्टाने पंढरपूर च्या विठ्ठल मंदिरातून बडवे आणि उत्पात यांची हकालपट्टी केली आणि सर्व विठ्ठल भक्तांना हायसे वाटले .. पेपर मेडिया मधून लगेचच बातम्या येऊ लागल्या कि विठ्ठल मुक्त झाला ,विठ्ठलाची सुटका झाली .. पण विठ्ठल मुक्त झाला का ? याचे उत्तर आहे कि नाही ,अजून तरी नाही .. विठ्ठल अजूनही बंदिस्त ठेवलाय त्याच्याच भक्तांनी .. सर्व संत मग ते संत ज्ञानेश्वर असो व तुकाराम ,त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले या विठ्ठलाला मुक्त करण्याचे आणि त्याचाच परिणाम म्हणून विठ्ठल काही अंशी मुक्त झाला पण पूर्णपणे नाही
                              सर्वप्रथम एका मोठ्या गैरसमजाने विठ्ठलाला भक्तांनी त्याला मूर्तीतच बंदिस्त केला आहे तो म्हणजे कि तो फक्त तिथच मूर्तीतच आहे ,ज्ञानेश्वरापासून ते तुकाराम ते बहिणाबाईपर्यंत सर्व सांगून गेले कि सर्व प्राणीमात्रा मध्ये तोच विठू आहे ,सर्व जीवांमध्ये सर्व फ़ुलांमध्ये तोच जिवलगा आहे ,सर्व रंगांमध्ये तोच पांडूरंग आहे पण त्याचे भक्त च ते मानायला तयार नाहीत .. आजही पंढरपूरच्या मंदिराबाहेर कित्येक भिकारी ,अगदी थोड्याशा जास्त पण नाही एवढ्या दानाची अपेक्षा करत बसलेले असतात ,मात्र विठूराया च्या भक्तांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय  .. दर्शन रांगेत ३ तास लागले तरी उभा राहायला ते तयार असतात पण मंदिराच्याच बाहेर एका मिनिटात सापडणार्या त्या गरीब माउलीकडे ढुंकूनही पाहायला वेळ नसतो .. विठ्ठलाला हजारो रुपयांचे अभिषेक केले जातात पण एखाद्या भुकेल्याला १० रुपये द्यायला पण कोणी पुढे येत नाही ..
                           रोजच्या आयुष्यात समोरच्या माणसांना किंमत न देता कसेही वागवतात आणि विठ्ठलाच्या फोटोला मात्र न चुकता हार घालतात .. स्वताच्या आई-वडिलांना किंमत देत नाहीत आणि पुंडलीकाला तो विठू त्याच्या आई-वडिलांच्या सेवेमुळेच प्रसन्न झाला हे विसरून निर्लज्जासारखे त्याच्याच पाया पडतात .. त्याच्या रुसलेल्या बायकोला म्हणजेच रुक्मीणीला मनवायला म्हणून विष्णू इकडे आला याच भान न ठेवता सर्रास स्त्रियांना मग ती बायको असो वा मैत्रीण व बहिण ,तिला शिव्या द्यायच्या आणि विठ्ठलासमोर येउन हरिपाठ म्हणायचा ..
                           एकादशी चा दिवस ,म्हणजे चिंतन मनन करत पोटाला उपाशी ठेवत ,भूक लागलेलि असताना पण विठूच्या नामाचा गजर करत आनंदात घालवायचा तो दिवस पण त्या दिवसाला पण फक्त उपवास धरायचा मुहूर्त करून टाकलाय नाही का ,गळ्यात माळ घालायची आणि सर्रास घाणेरडी कामे ,घाणेरडे बोलण करत फिरायचं ,त्या माळेला पण फक्त मटण न खाण्याच कारण बनवून ठेवलय ,बाकी काहीही करा कसाही वागा ती माळ घालून ,खरच विठ्ठलाला त्याच्या भक्तांचा हा ढोंगीपणा कळत नसेल का ..
                          आज तो विठ्ठलहि म्हणत असेल कि बाबा रे त्या बडव्यांच्या तावडीतून सोडवलत ,आता तुमच्या मनाताल्या बडव्यांना कधी दूर करताय ..  तो म्हणत असेल अरे डोळे उघडून पहा जरा ,मी सगळीकडे आहे ,मला फक्त मूर्तीत नका रे कोंडून ठेऊ .. खरा वैष्णव धर्म मानायचा असेल तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तुकाचे अभंग समजून घ्या ,नुसते पारायण नका करत बसू .. शेवटी एकच म्हणावेसे वाटते कि
                              व्यर्थ गेले तुका अन ज्ञानेश्वर व्यर्थ गेले
                              सर्व संताचे बोल जणू फुकाचे गेले ।।         

No comments:

Post a Comment