शब्द .. या जगात एखादी नवी गोष्ट निर्माण करू शकणारा निसर्ग आहे आणि त्यानंतर सजीव ,पण अजून एक जण आहे जो रोज नवनवीन काहीतरी निर्माण करत असतो ,तो म्हणजे शब्द .. या शब्दाची एक गोष्ट मला खूप खास वाटते ,कि हे शब्द अगदी क्षणात ,क्षणाचाही विलंब न लावता एखाद नवीन नात तयार करू शकतात आणि क्षणातच असलेल जुन नात तोडू पण शकतात .
शाळा वा कॉलेज मध्ये भेटलेल्या कुणा एका अनोळखी मुलासोबत बोललेल तेच थोडे शब्द ,ज्यांनी निर्माण केल आयुष्यभराच न तुटणार मैत्रीच ते नात .. कुठल्यातरी वळणावर कुणालातरी केलेल्या मदतीमुळे त्यांच्याकडून मिळालेले ते आशीर्वादाचे शब्द ,हे स्वतःविषयी अभिमान निर्माण करून गेले .. तर कधी वाढदिवसादिवशी अचानक आलेल्या एखाद्या जुन्या मित्राच्या कॉल येतो आणि जेव्हा तो म्हणतो कि "कसा आहेस मित्र ,बर वाटल तुझाशी इतक्या दिवसांनी बोलून" तेव्हा मनामध्ये जो आनंद निर्माण झाला तो निराळाच होता .. समोरासमोर भेटलो नसतानासुद्धा फक्त फोनवरच्या बोलण्यान दूर कुठेतरी राहणार कुणीतरी आपलसं होऊन जात ,ती पण या शब्दांचीच कमाल नाही का ..
माझ्यासाठी हा शब्द म्हणजे एक सखा आहे ,जेव्हा कोणी नसत सोबत तेव्हा याच शब्दांची सोबत मिळते ,आणि मग याच्या सोबतीने लिहितो बरच काही मनातल .. कधी कधी वाटत कि हे शब्द नसते तर माझ्या आयुष्यात इतकी नाती तयारच झाली नसती ,ना मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देता आली असती … तेव्हा माझा कधीही साथ न सोडणारा सखा झाल्याबद्दल या शब्दांचे शतशः आभार ..शब्दा शब्दा तुझी कमाल कसली
तुझ्यात सामावली नाती सगळी ,
तुझ्यामुळे हसलो तुझ्यामुळे रडलो
पण शेवटी तुझ्याच प्रेमात मी पडलो …
- सुधीर
very nice.nd true
ReplyDeleteThanks ....
DeleteThank you very much
ReplyDeleteNice what a beautiful essay