Thursday 3 April 2014

एक चंद्र आणि एक कळी .....

                 
                   कळी उमलण्याचे स्वप्न पाहत वेडा चंद्र रात्रभर जागा होता ,
                   कळी उमलणारच असा त्याचा विश्वास होता ..
                   सकाळ झाली ,काळी उमलली ,
                   पण तिला पाहायला चंद्र कुठे होता ?? …

                या ओळींचा आणि आपल्या आयुष्याचा खूप खोल संबंध आहे ,आता तुम्ही म्हणाल कि कस ? .. आपण एकतर त्या कळीसारखे असतो किंवा त्या वेड्या चंद्रासारखे .. 
           जे त्या कळीसारखे असतात त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर प्रेम करणारा ,त्यांची काळजी करणारा ,आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ द्यायला तयार असेल असा एखादा तरी चंद्र त्यांच्या आयुष्यात असतो ,पण त्या चंद्राची किंमत ,अथवा त्या वेड्या चंद्राच्या प्रेमाची किंमत जशी या कळीला कळत नाही ,तसच आपल होत .. आयुष्यातल्या त्या चंद्रासारख्या माणसांना आपण गृहीत धरून चालतो ,ते आपल्या आयुष्यात आहेतच ,आणि नेहमी आपल्यासोबत राहणारच आहेत ,आपली काळजी करणारच आहेत ,आपल्यावर जीवापाड प्रेम करणारच आहेत अस आपण गृहीत धरून चालतो .. पण एक सकाळ अशी येतेच जेव्हा आयुष्याची कळी तर उमललेली असते पण ती पाहायला तो वेडा चंद्रच नसतो ..तसच काहीजण आई-वडिलांना गृहीत धरतात ,काहीजण मित्रांना गृहीत धरतात ,काहीजण प्रेमाला गृहीत धरतात तर काहीजण प्रेम करणाऱ्याला गृहीत धरून पुढे चालत राहतात आणि एका वळणावर जेव्हा ते मागे वळून पाहतात तेव्हा हे सर्वजण कुठल्यातरी मागच्याच वळणावर आपल्यापासून दूर निघून गेलेले असतात ,इतके दूर कि पाहिजे तरी आपण त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही .. अशी त्या कळीची कहाणी … 
                आता त्या चंद्राच्या नजरेतून पाहिलं तर ,तसा वेडा चंद्र आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये कुठेतरी असतोच .. काहीजण प्रेमासाठी वेडे असतात ,काहीजण पैशासाठी ,काहीजण सत्तेसाठी तर काही जण पैसा आणि सत्तेसाठी .. आणि या वेडापायी ते अनेक स्वप्न पाहतात ,आणि ती स्वप्न पूर्ण व्हायची वाट पाहतात ,पण सर्वांचीच स्वप्न पूर्ण होत नाहीत ,शेवटी सकाळ झाली कि चंद्राला जावं लागतच ,आणि ती स्वप्नरुपी कळी येते सूर्याच्या वाट्याला .. तरीपण त्या चंद्राची ती जिद्द ,ते प्रेमरूपी वेडेपण हे निराळच असत , जस आई-वडील त्यांच्या मुलांसाठी वेडे होऊन आयुष्यभर कष्ट करतात ,त्यांच्यावर प्रेम करतात आणि मोठ झाल्यावर तीच मुल त्यांना सोडून निघून जातात .. एखादा प्रियकर त्याच्या प्रेयसी वर जीवापाड प्रेम करतो पण जेव्हा आयुष्यभर साथ देण्याची वेळ येते तेव्हा तीच त्याला सोडून निघून जाते .. असे अनेक उदाहरण देत येतील या चंद्रासाठी .. 
                 कुठेतरी आपल्या सर्वांच्या मनात हा चंद्र किंवा हि कळी असतेच .. शेवटी आयुष्य जगायला मिळत त्या कळीला ,स्वप्न पूर्ण होत त्या कळीचे परंतु त्या चंद्राच्या बलिदानाचा आणि प्रेमाचा थाटच काही और असतो ,त्यातली मजाच काही और असते आणि शेवटी आपल्या लक्षात राहतो तो वेडा चंद्र आणि त्याच वेड प्रेम .. तेव्हा तुम्ही ठरवा ,तुम्हाला चंद्र व्हायचय का कळी !!….
                                                             
                                                                                                                       - सुधीर 
                                                                                                                           9561346672

2 comments:

  1. सुरवातीचा चार ओळी खूप लहानपणी अगदी 14-15 वर्षांपूर्वी वाचलेल्या कुठेतरी आणि तेव्हापासून मनात होत्या अगदी.... खूप विचार करायची मी की कुणाला सुचल असेल हे? आणि आज सहज गुगल वर सर्च करू म्हटल आणि त्या ओळीं सोबत तुमचा पूर्ण लेख वाचायला मिळाला... खूप छान वाटलं सर..शब्दांत नाही सांगू शकत....

    ReplyDelete