असाच एक मुलगा ,एका मुलीवर जीवापाड प्रेम करणारा ,त्या मुलीन त्याच अख्ख जग व्यापून टाकलेलं असत .. त्याला फक्त जिकडे तिकडे तीच ती दिसत असते ,जणू काही तिच्याशिवाय या जगात दुसर कोणीच नाही अशी काही अवस्था होते त्या मुलाची .. त्याला दिसते फक्त तीच ती .. पण मग यालाच म्हणतात ना 'प्रेम ',स्वतःच अस्तित्व विसरून ,फक्त तिचा विचार करणे ,आणि स्वतःला विसरून फक्त तिचा होऊन जाणे …
एके दिवशी ती विचारते कि तुला माझी किती आठवण येते ,तेव्हा तो म्हणतो तू माझ्या डोळ्यासमोरून जायला तर पाहिजे ,तू तर मला दिसतेस ,सगळीकडे आणि सगळ्यामध्ये …
मनात तू ध्यानात तू
नकळत पडणाऱ्या स्वप्नात तू
ध्यास तू विश्वास तू
आनंदी मनाचा निःश्वास तू …
पानात तू फुलात तू
पहिल्या पावसाचा सुवास तू
रागात तू प्रेमात तू
नुकत्याच फुललेल्या कळीत तू …
चहात तू पाण्यात तू
नारळाच्या गोड गोड शहाळ्यात तू
दिवस तू रात्रीही तू
चमकणाऱ्या हजारो चांदण्यात तू …
इकडे तू तिकडे तू
दिसणाऱ्या प्रत्येक चेहऱ्यात तू
श्वासात तू आवाजात तू
भिरभिरत्या नजरेच्या शोधात तू ….
वाऱ्यात तू झऱ्यात तू
बागेतल्या सुंदर पाखरात तू
माझ्यात तू माझी तू
सगळीकडे फक्त तूच तू …
- सुधीर
9561346672
9561346672
No comments:
Post a Comment