परवा एका मुलीची ,एका मैत्रिणीची खूप आठवण येत होती ,बहुधा सध्या ती बरीच दूर ,महाराष्ट्राच्या सुद्धा बाहेर असल्याने कदाचित .. या ब्लॉग वरची पहिली कविता सुद्धा तिच्याच साठी होती ,आणि आजची हि कविता सुद्धा तिच्याच साठी आहे .. आणि जेव्हा हे शब्द सोबतीला असतील तेव्हा मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे दूर असलेल अंतर सुद्धा आडवे नाही येत.. म्हणून त्या माझ्या मैत्रिणीसाठी एक खास कविता ,काही ओळी माझ्या मनातल्या ,काही भावना माझ्या मनातल्या ,एक संदेश माझ्या मनातला ...
आठवण येतेय एका मुलीची
आयुष्यात आलेल्या
पहिल्या वहिल्या मैत्रिणीची
आठवण येतेय
माझ्या दिदीची ,माझ्या बहिणीची …
जन्म झाला तिचा तेव्हा
हळूच चोरून बघायचो तिला
आईच्या कुशीत निजलेल्या
त्या बाळाची
उगाचच का भीती वाटायची बर मला …
आईच्या कुशीत हि कोण आली
म्हणून कदाचित
भीत असेन मी तिला
तरीपण रडण ऐकू आल की
चोरून बघत असेन मी तिला …
एकदा धीर धरून गेलो तिचा जवळ
आई म्हणाली जवळ हिला
अरे वेड्या छोटी दीदी मिळाली तुला …
आता आठवत नाहीये की
बाळाला त्या पाहून काय बोललो असेन
पण छोटस ते गुबरु बाळ पाहून
मी गालातल्या गालात हसलो नक्की असेन
तीच होती माझी दीदी ,आणि
जी झाली माझी पहिली-वाहिली मैत्रीण
तिच्यामुळे शिकायला मिळालं
काय असत भाऊ असंण ,
आणि काय असत
कुणालातरी आपल मानून
तिची काळजी घेण ..
तेव्हा जी होती जवळ खूप माझ्या
आहे आहे ती खूप दूर
पण संपेल हा दुरावा सुद्धा
येईल आमचा दिवससुद्धा ,
जेव्हा ती असेल ,आणि मी असेल
आणि असेल आमची मस्ती …
ते एकमेकांच्या खोड्या काढण ,आणि
आई बाबांचं लाडक कोण यासाठी
नेहमी नेहमी भांडण ,
भांडून झाल की रुसवा फुगव धरण
अन हळू हळू पुन्हा बोलायला लागण …
आज आठवण येतेय त्या मस्तीची ,
आठवण येतेय त्या मुलीची
आयुष्यात आलेल्या
पहिल्या वहिल्या मैत्रिणीची
आठवण येतेय
माझ्या दिदीची ,माझ्या बहिणीची …
Missing You ....To my didi ,my sister
From your bhaiya ...
-सुधीर
-
अप्रतिम ......
ReplyDeleteThanks prafulla ....
ReplyDeleteएकदम मस्त......................
ReplyDeleteThnks aniket ..
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteThank you so much dIdi ...
Delete