क्षण .. कमाल असते ना या क्षणांची ,कसे बघता बघता ,आणि जगता जगता ,निघून जातात हातातून हे क्षण .. आपल्याला कळतही नाही आणि तोपर्यंत तो क्षण निघून गेलेला असतो .. आणि हा क्षण जातानाही एकदम गुपचूप आणि छुप्या पावलाने जातो बर का .. आत्ता या क्षणी मी हे लिहित आहे तो क्षणसुद्धा पण हे वाक्य लिहून पूर्ण होईपर्यंत निघून गेलेला असेल ,आणि तुम्ही हे वाचाल तेव्हा तर तो भूतकाळ बनलेला असेल ..
आपण सगळे जगतो म्हणजे हा येणारा प्रत्येक क्षण ,काहीतरी करतो .. काम करतो ,अभ्यास करतो ,विचार करतो ,बोलतो ,हसतो ,रडतो ,झोपतो ,खातो आणि असे असंख्य कार्ये ,जी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणात आपण करत असतो ,हेच ते असंख्य क्षण म्हणजेच जीवन .. हे क्षण सगळ्यांना सारखेच तर मिळतात .. आत्ता मी हे लिहित आहे हा क्षण ,या क्षणी तुम्ही पण तुमच्या आयुष्यात काहीतरी करत असाल न ,भलेही परिस्थिती वेगळी असेल तुमची आणि माझी ,पण क्षण तर तोच आहे ना .. मग अस का होत कि काहीजणच तो क्षण पुरेपूर जगतात ,आणि बाकीचे बस त्या क्षणाला असच जाऊ देतात ,न जगता ..
कारण कि भरपूर लोकांना हे कळतचं नाही कि आयुष्य म्हणजे कुठली भव्य-दिव्य अशी गोष्ट नसून ,आयुष्य म्हणजे हा आत्ताचा क्षण आहे .. आयुष्य ना मागे गेलेल्या क्षणांमध्ये असते ना पुढे येणाऱ्या क्षणांमध्ये असते ,ते फक्त असते या आत्ताच्या क्षणात .. बस एवढीच छोटीसी पण अख्खं विश्व व्यापून टाकणारी संकल्पना आहे आयुष्याची ...
मग मला सांगा कि भूतकाळात गेलेल्या क्षणांना कवटाळून बसण्यात किंवा भविष्यात येणाऱ्या क्षणांची कल्पना करून त्याच भविष्याच्या स्वप्नात अडकून राहण्यात काय अर्थ आहे .. जो जायचा तो क्षण केव्हाच निघूनपण गेला ,आणि जो भविष्यात येणारा क्षण आहे तो केव्हा येईल ,कसा येईल किंवा येईल का नाही हे सुद्धा कोणीच सांगू शकत नाही .. मग का उगाच या भूत आणि भविष्यात अडकून राहून हातातला हा क्षण वाया जाऊ द्यायचा …
म्हणून आयुष्य जगायचं तर या क्षणात जगा .. हेच आयष्य आहे आणि ते सदा सर्वदा सुंदर च असतं .. आणि हे आयुष्य दुसर तिसर काही नसून ,फक्त आणि फक्त ' हा आत्ताचा क्षण ' एवढच असत .. सर्व झालेल्याच दुख आनंद आणि होणारयाच दुख आनंद सोडा ,आणि फक्त हा क्षण जगा म्हणजे आयुष्य आपोआप जगाल …
शेवटी जाता जाता मीच इंग्लिश मध्ये लिहिलेलं एक सुंदर वाक्य सांगतो या क्षणाबद्दल ...
"In our life ,We lie to ourselves that we are moving forward .. Actually it is The Moment , the Time which ever truly moves forward in our life , all the time .."
- सुधीर
ekdum mast..
ReplyDeletethank you
DeleteNice word sudhir keep it up
ReplyDeleteof course atul ... thanks
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteitz Amezng Sudhu.....So nw it's ur tym guze dats wy njoy ech momnt of lyf.
ReplyDeleteThanks Rupali ...
Deletegela 1.5 tas tumchya मनातले विचार vachat basloy office mdhe..maze kam karnyache kshan nistun gele ki ho ya nadat.ata post lunch meetingla bomb ahe :-D
ReplyDeleteanyways khppppch chan...!!addicted zalysarkha vachat gelo ekaamagomag ek ....
Khup khup abhaar Monill .. Thanks 4 the compliment .. Glad u liked my thoughts and my writing .. Keep visiting ...
ReplyDelete