अपेक्षा .. आपल मन फक्त आपल्याला स्वतला वाचता येत आणि या मनात अपेक्षा फार निर्माण होतात रोजच्या जगण्यामध्ये .. फार कमाल असते या मनाच्या खेळाची आणि या अपेक्षांची .. समोरच्या व्यक्तीने माझी मनातली अपेक्षा पूर्ण करावी याचीच अपेक्षा आपण दिवसरात्र करत असतो .. म्हणजे सांगतो
मित्र मैत्रीण प्रेयसी ,आई वडील ,इतकाच काय तर रस्त्यावर भेटलेला अनोळखी व्यक्ती असेल तरी त्यान माझ्यासोबत अस वागल पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो .. म्हणजे अस एकही नात नाहीये कि ज्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा न करता राहतो .. हसण्याची गोष्ट म्हणजे आपण तर देवाकडून सुद्धा अपेक्षा करतो कि देवा माझ्यासोबत अस केल पाहिजे ,मला ते दिल पाहिजे ..
आता तुम्ही म्हणाल कि आपण समोरच्या व्यक्तीने आपल्याशी कस वागावं याची अपेक्षा ठेवण्यात गैर काय .. मी अजिबात म्हणत नाही कि यात काही गैर आहे .. उलट हा तर माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे .. पण .. समस्या तिथे सुरु होते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा तर ठेवतो पण जर त्या व्यक्तीने ती अपेक्षा पूर्ण नाही केली तर मात्र आपण त्या व्यक्तीवर चिडतो , मनातल्या मनात त्या व्यक्तीलाच दोषी मानू लागतो , तुमच्या मनातली अपेक्षा पूर्ण न केल्याबद्दल किंवा तुमच्या मनाप्रमाणे न वागल्याबद्दल ..
आता विचार करा , आत्तापर्यंत जितक्या पण वेळेला तुम्ही कोणावरही रागावलात किंवा भांडलात , ते खरच त्याची चूक होती म्हणून कि तुमच्या मनाप्रमाण ती व्यक्ती नाही वागली म्हणून .. तुम्हाला दिसून येईल कि समोरच्याची चूक असण्याच्या घटना फार कमी ,पण तुमच्या मनासारख , तुमची अपेक्षा होती तस ती व्यक्ती वागली नाही म्हणूनच तुम्ही भांडलात ,रागावलात ,कधी कधी तर त्यांच्यापासून दूर सुद्धा निघून गेलात
पण खरच या जगात कोणीपण कोणाच्याही अपेक्षेप्रमाणे ,मनाप्रमाणे वागू शकत का ? नाही ना .. आणि याच तेवढच स्पष्ट अस उत्तर हे आहे कि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुमच्या मनात नेमक काय आहे हे समोरच्या व्यक्तीला जसच्या तस समजण अजिबात शक्य नाही .. कारण तुमच्या अपेक्षा या तुमच्या मनात जन्म घेतात ,आणि तुम्ही कस काय अपेक्षा ठेऊ शकता कि तुमच्या मनात निर्माण झालेली अपेक्षा समोरच्या व्यक्तीन तंतोतंत ओळखून त्यानुसार वागाव ..
यासाठी एक छोटस सत्य लक्षात ठेवा कि तुमच मन फक्त आणि फक्त तुम्हालाच वाचता येत , म्हणून समोरच्याला स्पष्ट शब्दात सांगा तुमच्या अपेक्षा , सांगा कि तुम्हाला अस अस वाटते आणि त्यान तसं तसं कराव अस तुम्हाला वाटत .. पण समोरच्याला न सांगता , त्याने तुमच्या मनातल अगदी तंतोतंत ओळखाव आणि त्यानुसारच वागाव अशी अपेक्षा ठेवून उगाच सारखा सारखा अपेक्षाभंग करून घेण्यात अर्थ नाहीये .. याने फक्त माणस दुरावतात आणि नाती बिघडतात .. म्हणून संवाद वाढू द्या ,मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगा , मग बघा अपेक्षा आपोआप कमी होतात आणि आयुष्य सुंदर होऊन जाते …
याबाबतीत इंग्लिश मध्ये एक छान वाक्य आहे ..
Before You 'Assume' ,try this crazy method called 'Asking' ... बरोबरच आहे ,नाही का ….
- सुधीर
No comments:
Post a Comment