Sunday, 15 March 2015

तुझ नि माझ नात …


       काही काही नाती अशी बनतात कि त्यांची गोष्ट च निराळी असते .त्याचं एकत्र हसण ,त्याचं एकत्र रडण ,त्याचं एकमेकांना समजून घेण ,एकमेकांची काळजी घेण हे सर्व निराळच असत .. अचानकपणे आयुष्यात हे नात येत आणि बघता बघता तेच नात कधी आयुष्य बनून जात हे कळतसुद्धा नाही 

हसुनी विसरावं
विसरुनी हसावं
अस तुझ माझ नात
न तू कधी विसरावं
न मी ते विसरू द्यावं  ...

मी तुला सावरावं
तू मला सावरावं
अस तुझ नि माझ नात
सावरुनी एकमेका
तुझ्या आनंदात हरवून जाव  ...

स्वप्नातली परी तू कि
परी च मला पडलेलं स्वप्न
अस तुझ नि माझ नात
ना माझ्याविना तुला
न तुझविन मला काही सुचावं ...

आयुष्यात तू आली माझ्या कि
माझ आयुष्य तुझ्यापर्यंत आलं
अस कस ग आपल हे नात
न ओळखूनसुद्धा एकमेका
वाटत आयुष्य एकत्र चं जगावं ...

अस हे एक नात ..दूर असूनही जवळ वाटणारं आणि जवळ असूनही अजून जवळ याव अस वाटणार .. अस हे एक नात .. तुझ नि माझ नात …

                                                                                                 - सुधीर
                                                                                                 


3 comments:

  1. काही लोकांना नात्यांपेक्षा काहीच महत्वाचं नसतं...नाती जपणं हेच त्यांचं आयुष्य..आणि त्यांनी जवळ केलेली नाती आयुष्यभर अगदी निरागसपणे निभावतात...असं मला वाटत...(खरचं नात्याबद्दल खूप छान लिहिलंय तुम्ही..खूप आवडलं मला...पण काही लोकांना ती नाती नकोशी वाटतात याच गोष्टीच खूप दुःख होत...पण तुम्ही नात्याबद्दलच्या ओळी आणि कविता खूप भावली मनाला...)

    ReplyDelete