"डायना न्याड " , हिने नुकताच एक जागतिक विक्रम केला . तिने फ्लोरिडाची सामुद्रधुनी पोहत पार केली जे आत्तापर्यंत कोणालाही जमले नव्हते . तिने पार केलेली हि सामुद्रधुनी ११० मैल लांब आहे आणि ती पार करायला तिला ५२ तास आणि ५४ मिनिट लागले . आणि हि सामुद्रधुनी पार करताना तिने शार्कपासून संरक्षण करण्यासाठी वापरतात तसा कुठलाही पिंजरा किंवा कवच वापरलं नाही .
आता वरच वर्णन वाचनाऱ्या कुणालाही वाटेल कि डायनाचे वय साधारणपणे २० ते ३० वर्षे यादरम्यान असेल . पण winners ना एक सवय असते ती म्हणजे बाकीच्या जगाला ते सतत आश्चर्यचकित करत असतात . डायनाच वय तब्बल ६४ वर्ष आहे . होय ६४ वर्ष . ज्या वयात किंबहूना त्याआधीच खुपजण आयुष्य जगायचं कंटाळलेले असतात किंवा कुठल्यातरी आजारात खितपत पडलेले असतात आणि मरण यायची वाट पाहत असतात , त्या वयात डायनाने हा विश्वविक्रम केला .
एवढ्यातच तिची गोष्ट संपत नाही , डायनाने स्वतः एका मुलाखतीत हे सांगितलय कि ,ती जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक शोषण केले होते , आणि तरुण असताना तिच्या पोहण्याच्या प्रशिक्षकाने तिच्यावर अतिप्रसंग केला होता . समाजाच्या या इतक्या भयानक अत्याचारानंतर सुद्द्धा डायनाने हार नाही मानली आणि तीच स्वप्न पूर्ण करायची जिद्द नाही सोडली .वयाच्या ६० व्या वर्षापासून तिने हि सामुद्रधुनी पार करायचं स्वप्न उराशी बाळगून त्या द्रुष्टीने प्रशिक्षण सुरु केले . तेव्हा अनेकजणांनी तिच्या वयाकडे बघून तिला वेड्यात काढले , तेव्हा ती शांतपणे म्हणत असे कि ,मला जगातल्या बाकीच्या ६० वयाच्या लोकांना व सर्व तरुणींना हे दाखवून द्यायचंय कि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधीच उशीर होत नसतो ,फक्त तुम्ही ठरवण्याची आणि न हारता लढायची गरज आहे .
खरच , या ६४ वर्षाच्या तरुणीला व तिच्या या लढ्याला माझा मनापासून सलाम ……
hats off
ReplyDelete