रुसण ..
खोट-खोट ,जाणून बुजून ती माझ्यावर किंवा मी तिच्यावर रुसलो कि मला खूप आवडत .. कारण या रुसण्यापेक्षा जास्त गंमत रुसलेल्याला मनवण्यात असते ,आणि ते करताना जो खेळ आमच्यात चालतो ना त्यातली मजा ,त्यातलं प्रेमच निराळ असत ..
प्रत्येक वेळी ती माझ्यावर रुसली कि मग मला तिला मनवण्यासाठी काहीतरी करावच लागत ,एक वेगळी शक्कल लढवावी लागते .. मग ते काहीतरी जोक ऐकवून किंवा काहीतरी माकडचाळे करून तिला हसवायचा प्रयत्न करणे असो किंवा तिच्या मागे मागे फिरत सॉरी म्हणण असो किंवा तिच्या आवडीची एखादी गोष्ट आणून देण असो किंवा अशा अनेक गोष्टी ..
पण यावेळेस मीच तिच्यावर रुसलोय .. खर सांगायचं तर एक वेगळीच अनामिक भीती मनात येत आहे ,कि मी खोट-खोट तिच्यावर रुसलोय खर पण ती मला मनवायला येईल का ?
का माझ मलाच हे माझ रुसण मनातल्या मनात दडवून टाकावं लागेल ?
खरच ,तिने याव आणि तिच्या खऱ्याखुऱ्या मनवण्याने माझ्या या खोट्या खोट्या रूसण्यावर पांघरूण टाकावं अस वाटत आहे ..
तसं म्हणायला म्हणून
खोट-खोट रुसलोय मी खरा
पण रुसलेल्या मला
मनवायला ती येईल का ....
हसत हसत का होईना
पण 'सॉरी रे' अस
एकदातरी ती म्हणेल का ....
माझा हा असा
रुसलेला फुगलेला चेहरा पाहून
गालातल्या गालात
एकदातरी ती हसेल का ….
तसं खोट-खोट रुसलोय मी खरा
पण रुसलेल्या मला
मनवायला ती येईल का ....
रुसलेल्या मला
मनवायला ती येईल का ....
पण ती नाही आली ,आणि ती येणार तरी कशी .. ती त्या तिकडे आकाशात आणि मी इकडे जमिनीवर आहे ,आणि खरंच हे खूप जास्त अंतर आहे आमच्यामध्ये .. कितीही चाललो तरी हे अंतर नाही संपवू शकत मी ..
आत्ता इथे खिडकीतून त्या आकाशातल्या चांदण्यांकडे पाहत ,मी फक्त वाट पाहू शकतो कि कधीतरी मनवायला येशील तू ,हे जगण्या-मरण्याचे बंध तोडून कधीतरी येशील .. खोट-खोट रुसलेल्या मला मनवायला ….
- सुधीर
chan
ReplyDeleteThanks rupali ..
DeleteKHUP MAST LIHILAYS....TICH RUSAN...ANI TUZ MANVAN...KHUP SUNADR...ALL THE BEST...!!! MITRA....
DeleteKHUP MAST LIHILAYS....TICH RUSAN...ANI TUZ MANVAN...KHUP SUNADR...ALL THE BEST...!!! MITRA....
DeleteThank you so much priyanka ..
Deletevery touchy
ReplyDeleteThanks ..
ReplyDelete