काल काहीतरी घडल ..
अस काहीतरी पाहायला मिळाल जे खूप काही शिकवून गेल ..
कमाल असते ना ,हे आयुष्य कस कधी काय शिकवून जाईल हे कोणालाच सांगता येत नसत ..
काल मी असच जात असताना रस्त्यावर मला काही मांजरीची पिल्ले खेळताना दिसली ,ती पिल्ले मस्त एकमेकांसोबत खेळत होती ,अगदी स्वच्छंद होऊन बागडत होती ,कसलीच चिंता न करता फक्त आत्ताचे क्षण ,आत्ताच हे आयुष्य मस्त जगात होती .. तेवढ्यात खेळणाऱ्या त्या पिल्लापैकी एका पिल्लाने रस्ता ओलांडला ,आणि ते पाहून रस्त्याने तिथूनच चालत जाणारा एक माणूस जागीच थांबला .. मांजर आडवी गेली आहे तर आता काही तरी अपशकून होणार या भीतीने तो दोन पावलं मागे गेला आणि दुसऱ्या रस्त्याने गेला ..
तेव्हा खरच मला प्रश्न पडला कि ,मुक्तपणे स्वच्छंदपणे जगणारी ती पिल्ले हुशार का भविष्याच्या भीतीने पावलो-पावली रस्ता बदलणारा तो माणूस ? हातात आहेत ते क्षण मनसोक्त जगणारी ती पिल्ले आणि काहीतरी वाईट होईल या भीतीमध्ये कुठेतरी जगायचंच राहून गेलेला तो माणूस ,यांच्यात खरा जगण्याचा अर्थ नेमका कुणाला समजला हे तुम्हीच ठरवा ,मला तर ते समजलं …..
-सुधीर (9561346672)
sunder
ReplyDeleteThanks rupali ...
DeleteGood one... kash saglyana manjrichya pillan sarkhe jakta aale tar ayush khup sundar hoil......
ReplyDeleteती तशी जगतात कारण त्यांना दुसऱ्या प्रकारच जगणं माहित नाही ,आपल्याला माहित आहे कि स्वतःला पाहिजे तस न जगायची पद्धत .. हाच problem आहे कि आपण ती दुसरी च पध्दत निवडतो नेहमी ,पहिली निवडायची choice हातात असताना सुध्दा ...
DeleteMay be.....
Delete