Friday, 30 August 2013

दीदी

दिवस आहे तसा रोजचा पण 
तुझ्याविना रिकाम -रिकाम वाटतंय 
नात तर आहे जन्मोजन्मीच 
तरी तुझा साथ हवाहवासा वाटतोय

सोबत तर आहेच जन्मापासून तुझी 
तरी आज  तुझी आठवण काढतोय 
दूर नाहीयेस माझ्यापासून तू 
तरी उगाच दूर-दूर का वाटतंय 

खोड्या केल्या भांडणही केली 
ते सर्व आज खूप आठवतंय 
अधून मधून रागावातेस तू 
तरी त्यात तुझ  प्रेमच दिसतंय

लग्न झाल्यावर जाशील ना तू 
सोडून तुझ्या या भावाला एकटा 
डोळ्यात पाणी येत ग माझ्या 
चुकून  जरी विचार आला एकदा 

खुपदा चिडलो तुझ्यावर मी 
अनेकदा रुसवाही धरला
पण तुझ्यापासून दूर राहायचा 
प्रत्येक प्रयत्न जणू फसलाच

माझी लाडकी दीदी आहेस तू 
असा नाही दूर जाऊ द्यायचो 
प्रत्येक क्षणाला तुझा सोबत राहीन 
यासाठी तर मी मृत्यूलाही नाही भ्यायचो 

कितीही संकट येऊ दे जीवनात 
धीर अजिबात सोडू नको 
हा भाऊ कायम पाठीशी उभा आहे 
हे कधीच विसरू नको 

आता अजून काय लिहू 
सर्व तुला माहितीच आहे 
भाऊ नंतर आहे मी तुझा 
आधी तुझा मित्र आहे 

आयुष्यभर आनंदी राहा तू 
मग तुझा भाऊ हि हसेल 
पण सोडून जाऊ नको मला कधी 
तुज्याविना सर्व अपूर-अपूर  वाटेल
                                                                                                      -To my loveliest Didi 

1 comment: